चाहूल प्रेमाची...
सौ.स्वरूपा कुलकर्णी
चाहूल गुलाबी थंडीची ,
लागली हलकी हलकी,
मी रंगवू लागलो,
स्वप्ने अलवार काही
न बोलताही मी तुला,
किती कळतात त्या खूणा,
हा प्रेमसाधनेचा ,
ऋतू मनोहारी खरा
तू अवचित येते,
मी बावरून जातो,
भेटीतील क्षण टिपतो,
राहतो परत रिता एकटा
का काही समजत नाही,
कसा दिवाना मी होतो,
तू हलके स्मित करता,
मी होतो बैचेन खुळा
साद तुझी येता हलकेच,
मी होतो अधिर बावरा,
न सांगताही तुला ,
कळले भाव ते कसे?
ये ,ये ना जीवनी माझ्या,
संगिनी होऊन सखे गं,
तो क्षण येवो मांगल्याचा,
न मागणे देवा अजुन काही
Comments
Post a Comment