विषय- जगायचे राहूनच गेले....


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी


सुन म्हणून सासरी आले

नवऱ्याशी मी एकरूप झाले

हसत हसत संसार करत

नकळत त्यातच गुरफटून गेले....


हळूच आली पिल्लांची चाहूल

झाले आई मी रमले त्यातच

किती कधी मी वाटले गेले

नवरा पिल्ले नी सासूसासरे...


अशीच वेळ ती निघून गेली

पळपळ वाटला साऱ्यांसाठी

संसाराची वाहता ओझी

मी नाहीच उरले स्वतःसाठी...


पिले हळूच मोठी झाली

उडून गेली चाऱ्यासाठी

मी अन् तो फक्त उरलो

डोळ्यात पाणी हर एकांती....


कसे किती जगले स्वतःसाठी

न लागला हिशोब मजला कधी

मी होते अबोल केव्हा केव्हा

अरे,जगायचेच राहीले किती किती...


आयुष्याची ही संधी एकदा

न येते फिरूनी परत कधिही

मी विसरले संसारात नेहमी

न उरला वाटा स्वतःसाठी.....

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न