Homemaker की Housewife?

 Homemaker की Housewife?


🌷-सौ.स्वरूपा कुलकर्णी


       कालच एक मुलाखत ऐकली मधूरा वेलणकरची.त्यात तीला प्रश्न विचारला होता की, होममेकर व हाऊसवाईफ मधला फरक काय किंवा त्यांची व्याख्या काय? तीने खूप सुंदर उत्तर त्यात दिलं की हाऊसवाईफ ही घरात राहून घरातली कामं करणारी स्त्री असते.तर होममेकर ही स्त्रीही असू शकते किंवा पुरूषही.म्हणजे घराचा आधारस्तंभ किंवा घराला आर्थिकदृष्ट्या किंवा एकंदरीतच घर उभं करणारी किंवा करणारा स्त्री किंवा पुरूष हा होममेकर असतो.मला पटलं की होममेकर पुरूषही असतो किंवा स्त्रीही असू शकते.

      आपल्या समाजात आज स्त्रीयांच्या समस्या पूर्णपणे गेल्या किंवा वाढल्या हा माझा मुद्दा नाही.पण स्त्री ज्या वेगाने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे त्यावेगात पुरूषांनी फक्त घर सांभाळण्याकडे ओढा कमी दिसतो.म्हणजे माझा मुद्दा हाच की वर्षानुवर्षे पुरूषांनी घराबाहेर जाऊन नोकरी धंदा करावा व स्त्रीयांनी घरकाम करत आयुष्य कंठावं ही आपली जुनी रीत होती.पण काळानुसार पुरूषी वर्चस्वातून सुटून स्त्री ही मुक्त होऊ पहातीये.तीला तिचं अस्तित्व हवंय.तीही मन, बुद्धी विचार असलेली एक " माणुसच" आहे हे हळूहळू स्विकारलं जातंय.तिला घरात ठेवून जग जिंकणारा पुरूष काही खरा पुरूष नव्हे हे त्यालाही समजतंय.तिनेही जग पहावं, स्वतःचा ठसा उमटवावा, जगाने तिलाही "ओळखावं" ही तिचीही भूक असू शकत नाही का?हा खरा मुद्दा आहे.तीला संधी दिली तर तीही जग जिंकू शकते हे आजचा काळच सांगतोय.माझ्या भोवतीच्या अनेक स्त्रीया ह्या उत्कृष्ट होममेकर आहेत.घर सांभाळत नोकरी, बिजनेस करतात.त्यांची ओढाताण होत नाही असं नाही पण त्या तेव्हड्या कर्तव्यदक्ष व मेहनती आहेत.सक्षमपणे जगाशी लढायला त्या तयार आहेत.त्यांच्या अशा वाघिणीच्या अवताराने आसपासचे पुरूषही बदलत आहेत..आणि हो हा बदल नक्कीच सुखावह आहे. शहरात पुरूषही घर सांभाळायला मदत करतात असे अनोखे बदल कोव्हीड काळानंतर घडले.वर्क फ्रॉम होमने सर्वांनाचा आपापल्या बायकोची खरी किंमत कळालीअसे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.ती स्वतःला बऱ्याचदा विसरून घर ज्याप्रकारे सांभाळते ते पाहून पुरूषही विचार करू लागले की हे घरात तर मी कधी करून पाहिलच नाही😄.नुसतंच पुरूष म्हणून घेतलं स्वतःला पण ती..ती कितीही दुखलं खूपलं तरी अंथरून न धरता माझा डबा वेळेत करते.मुलं सध्या कोणत्या वर्गात शिकतात हे सुद्धा काही पुरूषांना माहीत नसतं तिथे ती आई मुलांना चांगलं घडवते.मी असं म्हणत नाही की सगळेच पुरूष सारखेच असतात पण वेळ आली की खरी परिक्षा होते.कोव्हीडमध्ये अनेक घरात अन्न शिजवणे हा किती कष्टाचा व स्कीलचा विषय आहे हे अनेक सो कॉल्ड सुशिक्षित व सोफेस्टीकेटेड लोकांना माहीत नव्हतं.नावं ठेवत नाही पण आपल्या जुन्या विचारांनी हा सगळा घोळ केलाय की स्वयंपाक फक्त मुलींना आला पाहिजे.पण आजच्या नोकरी करणाऱ्या स्त्रीया दोन्ही कसरती सांभाळतात.मुले मात्र मागेच.त्यांना आयतं खाणे ही सवय वर्षानुवर्ष जडलेली असते.ते काही त्यातून बाहेर पडू इच्छीत नाहीत.परदेशात शिकायला गेलेल्या मुलांना विचारा की तिथे खायचे प्यायचे किती हाल होतात.स्वतःचं स्वतःला सगळं करावं लागतं.तिथे आई नसते😄.म्हणून कुठल्याही कामाला हलकं न लेेखता घरात मुलगी असो वा मुलगा दोघांनीही आई बाबांना मदत करायची व आई बाबांनीही मुलांना चांगल्या गोष्टींची शिस्त व वळण लावायचं.स्वतःचं काम स्वतः करण्यात लाज कसली हे बिंबवायचं.

       मला मनापासून वाटतं होममेकर ही स्त्रीच आहे की पुरूष ही वादाची गोष्ट नसून दोघांनीही कामं शेअर करून घराला प्रगतीकडे नेणं हे फार महत्वाचंय. इथे मानसिकतेत खरोखरच बदल हवाय.जो नवरा बायकोंनी करायचाय.आपल्या घरात सर्वांनीच मुख्य कामांची कोणतीही लाज न बाळगता ती शिकायचीयेत.त्यात कमीपणा नसून उद्याच्या आनंदी घराची व विकसीत मनोवृत्तीची ती नांदी आहे.मग काय मंडळी होममेकर दोघेही होऊ शकतात.नक्कीच☺☺

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न