माझी झोप😄🤪


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी


काल उशीरा रात्री झोप आली....

उशी डोक्यावर ठेवली....

अंगाखाली पांघरून घेतले..

गाढ झोप लागली.....

सकाळी जाग उशीरा आली....

झोपेत डोळे मावत नव्हते.....

दाता समोर आरसा घासला.....

पेस्टवर ब्रश होताच!

भराभरा पाणी घेतले....

मस्त फ्रेश वाटले....

बशीतून कपात चहा फुर्रकन घेतला....

झोप थोडी गेली....

मग काय नाश्ता बनवला....

पाण्यात पोहे भिजवले.....

पोह्यात कढई घातली....

चांगले हलवले....

मग गरम गरम लोणच्यासोबत गार गार  पोहे खाल्ले....

मग आंघोळ केली...

पाण्याने अंग घासले....

साबण पडतच होती....

ओले कपडे घातले...

मग भूक लागली...

स्वयंपाक केला.....

पाण्यात कणिक भिजवली......

पोळीवर तवा भाजला.....

गरम गरम तवा  व भांडी खाल्ली....

मग केंव्हातरी दुपारी रात्र झाली व मी झोपले....


 आता खरी काय मजा आली सांगू मी खरीखूरी झोपेतून जागे झाले...🤪पहाते तर काय अजून सूर्य उगवायचा होता व मी मात्र स्वप्नाच रममाण झाले होते..


झोप भन्नाटच म्हणायची!😄😄

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न