राम व चंद्र

 दुडूदूडू धावत आला राम सज्जात कौसल्येपाशी,


म्हणे हे गोल खेळणे आणून दे मजला खेळायासी...

 

हसून बोलली कौसल्यामाई,अरे अवकाशीचा राजा चंद्रमा खाली कसा येई?...


राम सावळा धीट आग्रही म्हणे हवाच मजसी खेळायासी 

दे आणून तू माई...


म्हणे कौसल्या दशरथासी कसे समजवावे लेकरासी,


आणून द्या म्हणतो चंद्रमा मजला खेळायासी


दशरथासवे सारेच गुंगले काय करावे यासी?


रात्र हळूहळू पुढे सरकली तरी न उत्तर सापडे त्यांसी..


मग हळूच कौसल्या घेऊन येई जलपात्र मोठे रामापाशी..


मग प्रतिबिंब पडले त्यात शशीचे,

खूदकन हसले बाळ चिमुकले


अहा!! किती सुंदर माझे खेळणे   आले मजपाशी,

हसूनी कौसल्या-दशरथ पाही रामलीला  ती न्यारी....

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न