राम व खारूताईची गोष्ट


हनुमंताची वानरसेना करत होती जयघोष 


मुखे म्हणती आणि लिहीती पाषाणी श्री राम ...

    

करती तयार रामसेतू पोहोचावया लंकेपाशी...


प्रभू श्रीराम दुरूनी बघती हे दृश्य प्रेमभरे एकांती..


तिथूनी त्यांना दिसले एक  नवलचित्र वेगळे..


एक छोटी खारू लोळते वाळूपाशी सारखी...


मग लगबगीने जाते परत परत सेतूपाशी...


तिथे जाऊन अंग झटकते करी येरझार सारखी...


कळू न शकले तिचे खेळ ते राम तिला पाहती...


मग वानरास म्हणती पूस जा तिजला का करते ती असे सारखे...


वानर तिजला घेऊन आला प्रभूरामरायापाशी...


घाबरून ती पहात राही प्रभू श्री रामरायाशी....


ती म्हणाली म्हणे माझीही इच्छा रामसेतू बांधायाची...


परंतू नाही अंगी शक्ती मजला वानरसेनेची...


परंतू इच्छा तुझ्या सेवेची करावी असे वाटते..


कण कण वाळूचा गोळा करूनी सेतूपाशी टाकते...


ऐकून तियेचे वचन भाबडे राम नेत्र पाणावती...


घेऊन तिजला जवळी आपुल्या 

राम तिला गोंजारती...


तिच्या पाठीवर तीन बोटे उमटती सावळी सावळी....


देऊनी बक्षिस तिच्या सेवेचे जन आजही बघती...


खारूताईचा वाटा म्हणती आजही लोकं सारी...


रामायण हे सार सांगते ठेवा निष्ठा कार्यापाशी...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न