पांडुरंग
...
विठू माऊली माझी राहाते पंढरीसी,
ज्ञाना,तुका,नामा चालले वारीसी..
किती ओढ ती मिलनाची,
निघाली दिंडी पायीचं,
घाली रिंगण भक्तांचे,
विठू पहातसे कौतुकं..
तू असे मेघ आनंदाचा,
आम्ही तृषार्त चकोरं,
दे बा दर्शन विठ्ठला,
झालो कासाविस सर्व...
जनी म्हणे चक्रपाणी,
आसावला जीव भेटीसाठी,
मन जाई सवेग,
तुझ्या चरणांशी,चरणांशी...
मी उरले न आता,
भेट झाली की नाही,
न उरले भान आता ,
पांडूरंग भासे चराचरी..
तुचं मन गात्र माझे,
लागे ब्रह्मानंदी टाळी,
विठूराया माझी मीच,
आहे अभेद 'मी तू 'नाही
पांडूरंग,पांडूरंग
पांडूरंग,पांडूरंग
पांडूरंग,पांडुरंग,
पांडुरंग,पांडुरंग
Comments
Post a Comment