वारी_पंढरीची
कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी
विठूराया सावळ्या,लागली तहान मिलनाची
कशी भागवू रे सांग,भूक माझिया नेत्रांची
रंग सावळा तुझा रे, मन माझे त्यात गुंतले
लागली तळमळ ह्ऱदयाला,भेटीविणा तृप्ती नसे
तू उभा रे एकला, ठेऊनी कर कटावरी
तूझ्या पायीची रे वीट, झाली धन्य त्रिभूवनी
सावळ्या पांडूरंगा, तूझे ध्यान मनी मानसी
लागला रे छंद तुझा, मी गाते तुझी गाणी
रामकृष्णहरी लागला, ध्यास पदोपदी
चालतांना वाट पंढरीची,देहभान न उरले काही
ज्ञाना तुका मुक्ताबाई,रंगी रंगले तव नामी
गोऱ्हा एका जनाबाई, गुण आळविती अभंगी
संत माहेरी येतात, ऐक सावळ्या तूला भेटायासी
कर तृप्त मज विठाई,ओढ लागली तव दर्शनाची
Comments
Post a Comment