चारोळ्या
शब्द चारोळ्या उपक्रम
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
१.स्वप्न
स्वप्नीचे सूख पाहिले मी डोळा
करकटावरी ठेवूनी उभा साजिरा
कळेना कोणत्या जन्मीचे हे पूण्य
कवळीला विठू प्राणसखा माझा
२.सत्य
जग हे असे नाशवंत सारे
दिसे भासते ते मिथ्याच अवघे
नसे सत्य बाळा त्यात कोणतेही
असे ईश्वराची माया ही सारी
३.वाट
वाटेत आला अवचित सख्यारे
काळजात नाचले मयुर तत्क्षणी हे
मी संकोचूनी लाजले तूला पाहूनी अन्
तू उभा हाती घेऊन मेघ वर्षाऋतूचे
४.दुःख
मन माझे अबोल शांत सजना
झाले तुझ्यावीण अपार दुःखी
कशी सावरू त्याला मी एकली अन्
तुझा विरह जाचे आता क्षणोक्षणी
५.आठवण
दूर विखूरले आठवणींचे पक्षी
नका परत येऊ आता निशीदिनी
मनाला हवी साथ आता सख्या रे
तू माझा मी तूझी न उरले काही
Comments
Post a Comment