....बस्स हरदम तेरा साथ रहे।
- सौ.स्वरूपा कुलकर्णी
दिवसा सुर्य तर रात्री चंद्र असतो आपल्या साथीला...खरं तर हे ब्रह्मांडं तसं पाहिलं तर पूर्ण काळंशार पण यात चमकणाऱ्या ताऱ्यांनी,चांदण्यांनी व ग्रहांनी अवकाशाच्या ह्या भव्य पोकळीला रंग रूप दिले...बघा नं आपला दिवस असतो सूर्यनारायणामूळे व सूर्यास्तानंतर रात्र येते ती चंद्र तारकांच्या मैफिलीने सजलेली..ही सगळी मंडळी नसती तर कल्पना करा जग किती निरस असतं...माणसाच्या जन्मानंतर या भव्य सृष्टीला 'पहाणारा ' कोणीतरी भेटला..खरं तर इतर सजिव बघतातही पण त्यांना ती दृष्टी नाही ना...जी मनुष्याला आहे!
खरं तर ही सगळी चंद्र-सुर्य-ग्रहगोलांची दुनिया आपल्याला एक संदेश देते..काळ कोणताही असो सोबतीशिवाय मजा नाही..जग सतत बदलत असेलही..रंग, रूपही बदलेल , ते सतत नविन भासेल पण साथ कायम आहे...चंद्र- सुंर्य - तारे सतत आपल्यासमोर निरनिराळ्या ऋतुतही भेटतातच! ही निसर्गाची भव्य करामत तुम्ही आम्ही रोज अनुभवतो पण कधी विचार केलाय आपली वसुंधराही किती सुंदर! नेहमी सुर्याच्या कक्षेत फिरते पण तेही आपल्यासाठीच! तिने हा वसाच घेतलाय सर्व जीवसृष्टीचे पालन करण्याचा! ती आहे म्हणून आपले सृष्टीतले रोज नवे खेळ विनासायास पार पडतात...या निसर्गाला, जगनिर्मात्या अनाम शक्तीला नित्य अभिवादन केलेच पाहिजे..शेवटी 'तू आहेस म्हणून मी आहे' ही मानवाची भुमिका जगनिर्मात्यासाठी असावी असे मनापासून वाटते...
Comments
Post a Comment