#वसंत
✒सौ.स्वरूपा कुलकर्णी
रंग कोवळा पानोपानी
चहुकडे नवथर पसरला,
हिरव्या पोपटी रंगांचा
वसंत हा बहरला...
प्रत्येक पानावर पोहोचला
सुर्यकिरणांचा हस्तस्पर्श,
त्या स्पर्शातुन गवसला
रंग कोवळा गंध वेगळा...
मोगऱ्याचा गंध ताजा
पसरला नाकातून शरीरभर,
तनमन पुलकीत झाले
प्रणयोत्सूक ऋतू वसंत....
गुलमोहरा लालेलाल
रस्ता फुटे भर उन्हात,
झाडे उभी शांत शांत
झुळूक ती येते पानांत...
सकाळचे ऋतुरंग वेगळे
दुपार शांत उष्णही सापडे,
संध्याराणी मात्र आणते
नक्षत्रांचे हसरे देणे....
किमया ही निसर्गाची न्यारी
रंग वैभवी शृंगार अभिनव,
पानोपानी उतरला मदन
ऋतु सुगंधी हा सजला भूवर...
Comments
Post a Comment