#निद्रादेवी 

- सौ.स्वरूपा कुलकर्णी


काल रात्री झोपतांना अंगावरून पांघरून घेतले..

तेव्हड्यात रातकीडे ओरडण्याचा आवाज आला....

मी हळूचकन् खिडकीतून बाहेर डोकावले..

अय्या, बाहेर मस्त चंद्र-चांदण्यांची मैफिल रंगली होती..

मी हसून त्यांना शुभ रात्री केले..

मग निद्रादेवीची आराधना केली...

पण छे! आज काही ती लवकर प्रसन्न होईना...

या कुशीवरून त्या कुशीवर..छे! डोळा काही लागेना..

अम्म.. काय करू काय करू...

मग ठरवले मोबाईल बघावा...

पण किती वेळ बघणार? तोही  मला पाहून बोअर झाला...

शी बाई..आता काय करू, काय करू??..मग ठरवलं आकाशातल्या चांदण्या मोजूयात😄

मोजतांना कळलं आपली आकडेमोड फारच चुकतिये😄..आकाशातले तारे व अकलेचे तारे सेम सेम तोडतोय असं वाटलं😁

छे बाबा, हे काही आपलं काम नाही..

मग आठवलं १२ वी सायन्सला   रात्री अभ्यास करतांना पुस्तकं हातात घेतली की गाढ झोप यायची..तोच पर्याय आताही कामी येतो का म्हणून एक जाडजूड ग्रंथ हातात घेतला..


नी काय सांगू मैत्रिणींनो, 

ग्रंथाची प्रस्तावना वाचताच माझ्यावर निद्रादेवी प्रसन्न झाली...

डायरेक्ट सकाळीच जाग आली...

मस्त फ्रेश वाटलं...

एकूणच काय स्वतःवर जाम खूश झाले..😁


  ता.क.-झोप येत नसेल तर हा प्रयोग करून बघायला हरकत नाही😁

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न