आलंय माझ्या राशीला...


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


          मैत्रिणींनो, माझी रास धनु! राशीचक्रातील नववी रास! गुरू ग्रह हा राशी स्वामी! अत्यंत उत्साही, धाडसी, द्विस्वभावी व अध्यात्मिक रास म्हणून धनू राशीकडे पाहिलं जातं.या राशीचे अनेक पैलू आहेत.प्रपंचासोबत अध्यात्माचाही शिवधनुष्य पेलणारी ही गुरू ग्रहाची लाडकी रास...मी खरोखर भाग्यवान आहे की याचा प्रत्यय मला पावलो पावली येतो. सद्गुरूंचे आशिर्वाद व कृपा ही माझ्या जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे. 

      मंडळी, माझ्या राशीच्या व्यक्ती साधारणपणे Happy go lucky असतात.थोड्या मेहनतीनंतर भरपूर यश त्यांना मिळतं. परंतू, माझ्या राशीचा अवगूण हा की ती द्विस्वभावी रास आहे.पटकन निर्णय घेता येत नाही.त्यामुळे निर्णायक क्षणी फार फजिती होते.मी बऱ्याचदा महत्वाच्या क्षणाला Confusion मध्ये असते.ह्यातुन अनेक विनोदी किस्से निर्माण होतात. भिडस्तपणामुळे कधीकधी फसगत होते.लोकांची पारख करतांना चुका होतात.भोळसटपणा हा राशीचा गुणधर्म.त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

   मैत्री करणे हे ह्या राशीचे वैशिष्ट्य.अनेक मित्रमैत्रिणींचा गोतावळा ही ह्या राशीची खासियत.विश्वासार्हता, प्रेमळ,निष्कपट स्वभाव(हे खरं का तुम्हीच सांगा😛)!तसेच अहंकारही, मानी स्वभाव असतो.रागीटपणा असतो.

       माझ्या राशीचे लोक प्रामुख्याने अध्यात्मिक, साहित्यिक, शैक्षणिक नी राजकारण क्षेत्रात नाव कमावतात. राशीच्या धडपड्या स्वभावामुळे अनेक संकटातुन यशस्वीरीत्या बाहेर येतो हाही एक चांगला गूणधर्म !

       धनु रास ही कर्तव्य कठोर रास आहे तसेच आळस झटकून काम करणारी रास आहे.मैत्रिणींनो, या राशीच्या लोकांना नैराश्य लवकर येत नाही.त्या सकारात्मकतेवर खूप विश्वास ठेवून जगतात व परिस्थितीशी सामना करतात.उगाच परिस्थीतीवर रडत रहाणे यांना मंजूर नाही.गुरू स्वामी असल्यामुळे त्याचे गुणधर्म जसे  सद्सदविवेकबुद्धी हा स्थायीभाव असतो. तसेच, ह्या राशीच्या लोकांना लठ्ठपणा येण्याची शक्यता असते.

     एकंदरीत राशी छान आहे पण मी कशी ते मात्र तुम्ही माझ्या सर्व मैत्रिणीच जाणता.मला जवळून ओळखता.तुम्हाला एकूणच राशीबद्दल काय वाटलं व तुमचंही असंच मत आहे का? नक्की सांगा.

    ह्या राशीच्या मंडळी तुम्हाला अनेक ठिकाणी सापडतील हे मात्र नक्की..😊😍

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न