नवरात्री

 आश्विन शुद्ध प्रतिपदेचा हा

दिवस आहे अगदी खास

चहू बाजूला पसरला पहा

दिव्य सुगंधी कस्तुरीचा वास


घटस्थापनेचे मंगल पूजन

नवरात्रीचे हे पर्व शुभंकर

देवीची पूजा करूनी आता

लावू  देवघरात अखंड ज्योत


नऊ दिवस देवीची आपण

करूया मनोभावे आराधना

पूर्ण करेल देवी भक्तांची

भोळीभाबडी मनोकामना


दुर्गा सप्तशतीचे पाठ नित्य

मनोभावे देवीसमोर करूया

होता पाठाच्या सांगतेने

देवीची आरतीही करूया


नऊ धान्य एकत्र करूनी

घटस्थापना करू आईची

दिव्य पुष्पमाला अर्पूनी

नैवद्य दाखवू खिरीचा


देवी दुर्गा दशप्रहरणधारीणी

चंडिका तू माताभवानी

करते नमन देवी अंबिकेसी

बल दे लढाया तुझ्या लेकरांसी


यश दे बुद्धी दे माताभवानी

स्तविते मी तुजला परोपरी

देई प्रतिसाद लेकराला गे

आर्त गीत तुझेच गाई

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न