**काव्यबंध समुह आयोजित,

काव्यलतिका स्पर्धा,* 

 *विषय- गौराई आली घरा* 


 *शिर्षक- आली आली गौराई माझी* 



आली आली गौराई माझी,

सोनपावलांनी आली,

घेऊन मांगल्याची किरणे,

उजळली घरदारं अवघी...


ज्येष्ठा आणि कनिष्ठा रूपे तुझी, 

बहु गोड ती मना भावली,

भक्त प्रेमासाठी घेतसे रूप,

आवड देवी तुला लेकरांची..


आगमने तुझ्या चैतन्य पसरले,

मन हे माझे आनंदून गेले,

धूप, दीप, नैवेद्य, आरती,

सुगंध  दरवळला दिशा दाही..


तीन दिसांची माहेरवाशीण तू,

पुत्र गणेशासवे घरा येशी,

घरातल्या लेकीबाळींसवे,

मनोमन आनंदून जाशी....


तुझ्या आवडीचे फराळ केले,

शुध्द तुपात लाडू मी वळले,

अनारसे करंजा पोटी मी घातले,

तूझ्यासाठी पंचपक्वान्न बनवले...


सोळा भाज्या सोळा चटण्या,

तुझ्यासाठी गोड जिन्नसही केले,

फळ,फुले दक्षिणा समोर ठेवली,

मनोभावे मी ओटी भरली...


तुझी पुजा मी भक्तीभावे करते,

माझी मनोकामना पूर्ण कर हे माते,

तुझ्या लेकीस सुखी ठेव आई,

विनंती चरणी वारंवार करते...


 *- सौ.स्वरूपा कुलकर्णी,* 

राहाता, अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न