काव्यबंध समुह आयोजित,

 काव्यलतिका स्पर्धा,


विषय- ह्रदयी वसंत फुलतांना




शीर्षक- अनोळखी प्रिती





अनोळखी या वाटेवरती

फुले उमलली सहज सुगंधी,

सहवासाचे ऋतू कोवळे

अलगत आले तारूण्यात ते




मी संकोचून पहिल्यांदा

प्रश्न विचारी जगावेगळे,

तूही हसूनच बोलत राही

उत्तर देई अवखळ मज ते




कशी मी गुंतले तुझ्याभोवती

नकळे भान सुटले अवघे,

भूत भविष्य सारे विसरून

समीप आलो प्रेमऋतुते..




कसे कधी न काही कळले

एव्हडे अंतर क्षणात सरले,

तुम्ही तुम्ही करता करता

तू तूझी मी बनले सख्या रे


बोलते तुझ्याशी शब्द ह्रदयीचे,

राहू न शकले मन्मनी ते,

किती अनोळखी होता पूर्वी,

आज आहेस मत्प्रिय सखा रे



जग हे माझे एकरंगी रे,

झाले सप्तरंगी इंद्रधनू हे,

कशी सावरू भान स्वतःचे,

उरला तूच, तूच आता रे




सावध होते इतुके साल मी

विसरले माझे सुर वेगळे

आता आळवते सूर मखमली

तुझी नी माझी प्रित नवीनवी...




-सौ.स्वरूपा कुलकर्णी

राहाता,अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न