*उन्हाळ्याची सुट्टी* 



कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी



शाळेला लागली सुट्टी-बुट्टी,

चला खेळू खेळ नवनवीन,

नको अभ्यास नको परिक्षा,

नाचू बागडू या सगळे या...


मोबाईलपासून जरा दूर व्हा,

चला मैदानी खेळ खेळूया,

कबड्डी,खोखो, लपाछपी,

ताजेतवाने राहू नेहमी...


आंबे खाऊ रोज पोटभर,

लोणची करू चट्टमट्ट,

पापड खाऊ तळून भाजून,

जेवण करू लोळू तासभर...


रोज निजूया गोष्टी ऐकत,

चांदोबाची सैर करूनी,

गोष्ट चेटकीणीची ऐकू परत,

घाबरून झोपू आता लवकर...


मग जाऊ मामाच्या गावी,

आगिनगाडी धूर सोडी,

आजी आजोबांच्या पडू गळ्यात,

मस्ती करू भावंडांशी...


अशी घालवू सुट्टी-बुट्टी,

वाटे संपूच नये कधीही,

आठवणीत रहाते मला नेहमी,

फिरून यावी ही  सुट्टी- बुट्टी!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न